बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटले, खायला मटन मासे पुरवले’; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

सांगोला | निवडणूक जिकंण्यासाठी लोकप्रतिनीधींनी मतदारांना पैसे वाटणे किंवा इतर सुखसोयींचं आमिष देणं, अशा घटना सतत ऐकायला मिळतात. पण त्यानंतर कोणी ते मान्य केलेलं अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाही. मात्र एका आमदाराने चक्क निवडणूक जिंकण्यासाठी आपण काय काय केलं होतं? याची सर्वांसमोर कबूली दिली आहे.

शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान सर्वांसमोर हा गौप्यस्पोट केला आहे. सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला ते गेले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात आपण साखर कारखान्याच्या निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या गैर कारभाराचा पाढाच उकलला आहेे.

ते म्हणाले, “दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून सभासदांना विमानाने आणलं. सभासंदाना प्रत्येकी 3 हजार रुपये वाटले. जवळपास 1700 सदस्यांना कोल्हापूरात ठेवून त्यांना खायला मासे, मटन दिलं. पत्ते खेळायला पैसे पुरवले. असे एकूण 57 लाख रुपये वाटून साखर कारखान्याची निवडणूक लढवली, अशी कबुली त्यांनी दिली आहे.

पाटील यांनी यावेळी सांगोला कारखान्याच्या दुरावस्थेला आपणच जबाबदार असल्याचं देखील कबूल केलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मी पैसे वाटले. मासे, मटन खायला घातलं. त्यामुळे इतर नेत्यांबरोबर मी सुद्धा तितकाच पापी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सर्वांसमोर दिलेल्या कबूलीमुळे सर्वच हैराण झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील

पुण्यातील उपायुक्तांचं भांडं फुटलं, घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं!

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

“येत्या 15 दिवसांत भाजपचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More