बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“20 मिनिटात ॲम्ब्युलन्स नाही आली, तर मी सगळ्या ॲम्ब्युलन्स रॉकेल टाकून फुकुन देईल”

हिंगोली | हिंगोलीचे आमदार संतोष बांगर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. 90 लाखांची बँकेतली ठेव नागरिकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी मोडल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षावही झाला. त्यानंतर आता 108 या रुग्णवाहिकेचं व्यवस्थापन बघणाऱ्या कर्मचाऱ्याशी बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

हिंगोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद अध्यक्ष यांची तब्येत खराब होत असल्याने त्यांना औरंगाबादला हलवण्यात यावं असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी 108 या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. पण रुग्णवाहिका येत नसल्याने ते संतप्त झाले.

संतप्त झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी रुग्णवाहिकेचं व्यवस्थापन बघणाऱ्या कर्मचाऱ्याला फोन करत त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. “दोन तास वाट बघूनही जिल्हा परिषद अध्यक्षांना रुग्णवाहिका मिळत नसेल, तर हिंगोलीमध्ये एकही रुग्णवाहिका चालू देणार नाही आणि उभ्या रुग्णवाहिकेला रॉकेल टाकून फुकुन देईल”, असा सज्जड दम आमदार संतोष बांगर यांनी कर्मचाऱ्याला फोनवरून दिला.

या सर्व प्रकारादरम्यान आमदार संतोष बांगर यांनी 20 मिनिटात जर रुग्णवाहिका आली नाही, तर उद्या सगळ्या रुग्णवाहिका रॉकेल टाकून फुकून देईल आणि जिल्ह्यात एकही रुग्णवाहिका चालू देणार नाही. असं त्या कर्मचार्‍याला फोनवरून बजावलं. या प्रकरणानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 5 वाजता रुग्णवाहिका मागवली पण 8 वाजेपर्यंतही रुग्णवाहिका न आल्याने मी संतप्त झालो, तसेच यानंतर असा प्रकार घडल्यास मी 100% रुग्णवाहिका जाळल्याशिवाय राहणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

ऐका ऑडिओ – 

थोडक्यात बातम्या

“कोरोना संसर्ग वाढवण्यास लसी न घेणारे लोकचं कारणीभूत आहेत”

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 88 व्या वर्षी केली कोरोनावर मात

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सरकारला ‘या’ सूचना

राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More