राजू शेट्टी सूर्य, तुम्ही काजवे; शिवसेना आमदाराला स्वाभिमानीच्या छोट्या कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र

सोलापूर | शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या छोट्या कार्यकर्त्यांनी खरमरीत असं पत्र लिहिलं आहे. रणजित बागल असे या राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याचे नाव असून हे पत्र सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

थकीत एफआरपीवरुन खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्याप्रकरणावरून रणजित बागल यांनी सांवत यांना पत्र लिहिलं आहे.

सावंत तुम्ही ज्यांच्यासमोर आपली मस्ती दाखवलीत ते राजु शेट्टी हे शेतकरी व कष्टकरी व बळीराजासाठी नव्या युगाचा सुर्योदय घेवुन आलेले सुर्य आहेत आणि तुम्ही म्हणजे त्या तळपत्या सुर्यापुढे कधीतरी चमकणारे काजवे, अशी खरमरीत टीका रणजीत बागलने या पत्रातून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!

पृथ्वीराज चव्हाणाची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते

-आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?