मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

लातुर |  काँग्रेस राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षणासाठी खिळवत ठेवले, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी संविधानिक पद्धतीने मराठा समाजाला न्याय मिळवून दिला, अशी स्तुतीसुमने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांंवर उधळली आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी तानाजी सावंत लातुरात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी मराठा आरक्षणावर संवाद साधला.

आरक्षणाच्या आंदोलनात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना… युतीत तु-तु.. मैं-मैं चालू असताना आमदार सावंतांनी केलेल्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

-महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं…

आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

Google+ Linkedin