Loading...

अयोध्या निकालानंतर शिवसेना आमदारांनी केलं बाळासाहेबांना वंदन!

मुंबई |  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिर होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर शिवसेना आमदारांनी एकत्र येत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंना वंदन केलं आहे.

मुंबईतल्या शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे. याच ठिकाणी शिवसेना आमदारांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आणि राम मंदिरासाठी बाळासाहेबांनी केलेल्या कष्टाची आणि लावून धरलेल्या भूमिकेच्या आठवणी जाग्या केल्या.

Loading...

कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला.., हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… जय श्रीराम… अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणादून सोडला होता.

दरम्यान, आजच्या दिवशी हा निकाल ऐकायला बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते, अशी भावना राज आणि उद्धव या दोघा बंधूंनी व्यक्त केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...