बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंनी फडणवीसांच्या पदराआडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचे दर्शन घेऊन गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. यावरून राज्यातील तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

विनायक राऊत यांनी दोन दिवसांपुर्वी सोशल मीडियावरून सांगितलं होतं की नारायण राणेंना मी शिवसैनिकप्रमुखांच्या स्मृतीचे दर्शन घेऊ देणार नाही. तसेच बाडग्यांना तिथे प्रवेश नाही, असं राऊत यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राणेंनी गुरूवारी दर्शन घेऊन जनआर्शीवाद यात्रेला मुंबईतून सुरूवात केली. यावरून पुन्हा एकदा राऊतांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदराआडून राणेंनी दर्शन घेतलं आहे. त्या ठिकाणी फक्त फडणवीस आणि दरेकर जाणार असल्याने शिवसेना शांत बसली होती. त्यांना शिवसैनिकांचा विरोध नव्हता. तसेच या दोघांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे. परंतु नारायण राणे यांनी तो अधिकार केव्हाच गमावला आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद अशा बाटग्यांना कदापिही मिळणार नाही, असं म्हणत राऊत यांनी नारायण राणेंना टोला हाणला आहे.

दरम्यान, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीच फरक पडणार नाही. हे सरकार पाच काय दहा वर्ष टिकेल.  या सरकारने महाराष्ट्राची वाट लावली आहे असं जरी राणे म्हणत असले तरी केंद्रातल्या सरकारने काय केलं आहे?, महागाई तसेच इंधनाच्या दरवाढीमुळे सामन्य जनता यामधून होरपळून जात असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कंडोममध्ये सोनं घालून अशा जागी लपवलं, मुंबई एअरपोर्टवर पोलीसही हैराण!

“आता तरी मोदी देवा पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का?”

‘विश्वासघातकी पुरस्कारासाठी राज्यातील ‘हा’ नेता जास्त लायक’; मराठा आरक्षणावरून मेटे आक्रमक

ऊसतोड कामगारांचा मुलगा बनला आंत्रप्रन्योर, पाहा व्हिडीओ

टिश्यू पेपरची किंमत चक्क कोटींमध्ये; तब्बल ‘इतक्या’ कोटीला विकला गेला ‘तो’ खास टिश्यू पेपर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More