शिवसेनेला आणखी एक झटका?; शिवसेना खासदाराच्या पत्राने टेन्शन वाढलं
मुंबई | विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना आमदारांनी पक्षाशी दगाबाजी करत मते फोडली होती. त्यामुळे शिवसेनेला भारी नुकसानाला सामोरे जावे लागले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतरच महाविकास आघाडी सरकारमधील माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत नाराजीनाट्य आणि सत्तानाट्य केलं होतं. त्यांनतर त्यांनी भाजपशी संयुक्त युती करत सत्ता स्थापन केली.
शिंदेंसोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी पोबारा केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पक्षातील प्रत्येकाकडे ते संशयाने पाहू लागले आणि पुन्हा नव्याने शिवसेना उभी करु असे म्हणाले होते. मध्यंतरी शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यामुळे आता विधान परिषदेप्रमाणे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील शिवसेना खासदार पक्षाचा व्हिप पाळणार नाहीत का?, अशी चर्चा आहे.
आदिवासी समाजातील कर्तृत्ववान महिला म्हणून भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना शिवसेनेने मत द्यावे, अशी मागणी करणार पत्र शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. बंडखोर आमदार आणि खासदार भावना गवळी यांच्यानंतर शिवसेनेचे इतर खासदार भाजपची पाठराखण करणाची भूमिका घेत आहेत.
यापुर्वी माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक महिला देशाची राष्ट्रपती होणार म्हणून आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन महाराष्ट्रतील कर्तुत्वान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी म्हणून काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना मते दिली होती. तसेच दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुर्खर्जी यांना देखील पाठींबा दिला होता. भाजपशी हाडवैर होऊन दुखावलेले उद्धव ठाकरे आता कोणता निर्णय घेणार, याकडे त्यांच्या खासदारांचं आणि जनतेचं लक्ष लागलेलं आहे.
थोडक्यात बातम्या –
शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही
पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी
‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला
‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका
Comments are closed.