Top News

शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी

हिंगोली | भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मात्र तीन पक्ष एकत्र आले खरं पण आतमधील कुरबुरी बाहेर येऊ लागली आहे.

शिवेसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड किंवा हिंगोलीचा काँग्रेसचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली आहे. पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी ही मागणी केली असल्याची माहिती समजत आहे.

नांदेडचे अशोक चव्हाण तर हिंगोलीमध्ये वर्षा गायकवाड पालकमंत्री आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काँग्रेसचे असल्यानं दोन्ही पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामे होत नसल्याचा  आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान,  वर्षा गायकवाड या सर्वांना सोबत घेऊन विकासकामं करत आहेत असं म्हणत काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण

देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार

‘तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार’; भातखळकरांची जहरीटीका

मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या