शिवसेनेची स्वबळाची घोषणा, खासदारांमध्ये मात्र अस्वस्थता

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केलीय. मात्र त्यांच्या या निर्णयाने शिवसेनेच्या काही खासदारांमध्ये अस्वस्थता पसरलीय. राज्यसभेतील खासदारांच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेण्याची गरज नव्हती, अशी भावना व्यक्त केली जातेय. 

विधानसभेसाठी शिवसेनेला भाजपची फारशी गरज लागणार नाही. इथं दोघांनाही एकमेकांची गरज आहे. लोकसभेसाठी मात्र शिवसेनेला भाजपची गरज लागते, असं शिवसेनेच्या काही खासदारांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे विधानसभेसाठी स्वतंत्र आणि लोकसभेसाठी शिवसेना-भाजप एकत्र लढतील असा अंदाज होता. मात्र युती तोडण्याची घोषणा करुन आम्ही भाजपला तयारीसाठी वेळ दिला, असं शिवसेनेच्या काही खासदारांचं म्हणणं आहे.