बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ

मुंबई | धार्मिक वादावरून होणारे दंगे, हिंसाचाराच्या घटना यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. देशात होणारे दंगे, हिंसाचाराच्या घटना याला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्ली महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठीच हनुमान जयंतीनिमित्त भाजपकडून दंगल घडवली गेली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. धार्मिक वादामुळे देशभरात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना या भाजप प्रायोजित आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

हनुमान जयंती आणि रामनवमीला याआधी कुठेही, कधीही दंगे झाले नाहीत. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारच्या हातात आहे. तरीही दिल्लीत दंगे होत आहेत. याला पुर्णपणे भाजपच जबाबदार आहे, असा आरोप देखील संजय राऊतांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपला आता आघाडीची भीती वाटत असल्यानेच राज्यात दंगलीतून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप आता फोडा आणि झोडा या नितीचा अवलंब करत आहे. मात्र, जिथे शक्य आहे तिथे तिन्ही पक्ष एकत्र येऊ, असं देखील संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

“सिल्वर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला”

मोठी बातमी! मुंबई महापालिकेचा नारायण राणेंना झटका

“…अशा पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

“गिरीश महाजनांनी मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More