मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातील भाजप (BJP) नेत्यांवर टीकेची तोफ डागली आहे. मात्र, संजय राऊत यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है…’, असं ट्विट राऊतांनी केलं होतं.
या ट्विटवरून संजय राऊतांनी आता मौन धारण केलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर संजय राऊत यांनी थोडा उशीरच केला, असा टोला भाजप नेत्यांनी या ट्विटवरून लगावला होता. यानंतर राऊतांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या चर्चांवर स्पष्टिकरण देत तुफान टोलेबाजी केली.
काल भाजप नेत्यांनी बरेच पतंग उडवले. पण संजय राऊत, शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आवाज कोणी बंद करू शकणार नाही. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत घडलेली माणसं आहोत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना ही वाघाची गर्जना आहे आणि वाघ कधी मौनात जात नाही. आम्ही कमी बोलल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी किंवा राजकीय विरोधकांनी आनंद साजरा केला असेल. त्यामुळे मी त्यांच्या आनंदात मीठाचा खडा टाकला नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘रशियन सैनिकांनी माझ्या पतीला गोळी मारली आणि मग माझ्यासोबत…’, युक्रेनियन महिलेच्या दाव्यानं खळबळ
“… त्यामुळे भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे”
मोठी बातमी! कोरोना निर्बंधांबाबत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय
मोठी बातमी! युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबद्दल रशियाचं मोठं वक्तव्य
राजकीय वर्तुळात खळबळ! संजय राऊत आणि ‘या’ भाजप खासदारामध्ये 3 तास बैठक
Comments are closed.