Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यपालांच्या अंगणात लोळण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा करा- संजय राऊत

Loading...

मुंबई |   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाीवर टीका करत ठाकरे सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढण्यात सपशेल अपयशी ठरलं असल्याचं सांगत गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरूनच त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता शिवसेनेने देखील त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे, असा बोचरा वार त्यांनी भाजपवर केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या निमित्ताने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत व सरकार त्या प्रश्नांशी झगडत आहे हे खरेच. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी प्रश्न सोडविण्याच्या कामी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

राज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…!

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या