Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“कोणाच्या बापात महाराष्ट्र सरकार पाडायची हिम्मत नाही”

मुंबई |  मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ऑपरेशन लोटसच्या चर्चा सातत्याने होत आहे. मात्र महाराष्ट्र सरकार पाडायची कोणाच्या बापात हिम्मत नाही, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Shivsena Mp Sanjay Raut On Operation Lotus)

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, असं राऊत म्हणाले.

कोरोनावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना  म्हाळगी प्रबोधिनीमध्ये क्वारंटाईन करावे, असा टोला त्यांनी लगावला.

ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्रात मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे. मात्र, भाजपला राजकारणच करायचे असेल तर त्यांना विरोधी पक्षातही बसण्याचा अधिकार नाही, असं राऊत म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती

जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांकडून आरोग्यमंत्र्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाले…

कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद’ केल्यास भीषण परिणाम! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा कंत्राटी कामगारांना सर्वोच्च प्राधान्याने सुविधा पुरवा

31 तारीख नाही तर पुढील आदेश निघेपर्यंत दिलेले आदेश पाळावेत- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या