बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… तरअशाने इस्लाम खतऱ्यात येईल’; संजय राऊत यांचं अग्रलेखातून सडेतोड भाष्य

मुंबई |  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतल्या मरकज प्रकरणावर सडोतोड भाष्य करत मरकजच्या आयोजकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. देशात कोरोनाचा आगडोंग उसळत असताना जर मरकजचं आयोजन केलं नसतं तर धर्मावर काय मोठं संकट येणार होतं? असा सवाल करत तुम्ही जर असच वागत राहिलात तर अशाने इस्लाम खरंच खतऱ्यात येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुसलमान समाजात जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे. तेथेही ‘लॉक डाऊन’ आहे. मग येथे ‘मरकज’च्या झुंडी जमा का करता? अशाने इस्लाम खरंच खतऱ्यात येईल हो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

निजामुद्दीन परिसरात जमलेल्या या धार्मिक झुंडीने देशाला 380 कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे ‘मरकज’ही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…

दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला

महत्वाच्या बातम्या-

सोलापुरातील दगडफोड्याच्या पोराची जिद्द; परिस्थितीवर मात करत झाला DYSP

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी; परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More