बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. त्यात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) व किरीट सोमय्यांवर जहरी टीका केली आहे.

विरोधकांवर हल्ले म्हणजे काय?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. जर एखादा माथेफिरू, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मुर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, परत सत्तेत येऊ शकले नाहीत याची अस्वस्थता असून पुढचे 25 वर्ष पुन्हा येण्याची शक्यता नाही. अशांत मन असेल तर त्यांनी आपल्या देवघरात हनुमान चालिसा वाचून मन शांत करावं, असा सल्ला देखील संजय राऊतांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

एलॉन मस्क यांनी तब्बल ‘इतके’ पैसे मोजत खरेदी केलं ट्विटर

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…

“सोनिया गांधींसमोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More