नवी दिल्ली | काँग्रेस काय परदेशातून आली आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्वाची चांगलीच स्तुती केल्याचं पहायला मिळालं. राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच सरकारवरही त्यांनी यावेळी महत्त्वाचं भाष्य केलं.
काँग्रेसचं या देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान आहे. ते काय पाकिस्तानातून आले आहेत का? काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आहे तर त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. सोनिया गांधींना वाटलं नसतं तर आज हे सरकार अस्तित्वात नसतं हे मान्यच करायला हवं आणि तेवढा मनाचा मोठेपणा आमच्याकडे आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.
विरोधकांकडून राज्य सरकारवर जे आरोप सुरु आहेत, यावर बोलताना ते विरोधकांचं काम आहे त्यांनी ते करत रहावं, आम्ही विरोधात असताना असे आरोप करत होतो. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्या कामाचंही कौतुक केलं.
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील सर्वात सुरक्षित सरकार आहे. जिनलेटीनच्या कांड्या ठेवलेली गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर नव्हे तर तिथून एक किलोमीटर दूर सापडली. काँग्रेसच्या संमतीने शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व द्यायला हवं. नरेंद्र मोदी आमचे दुश्मन नाहीत त्यांच्यासोबत आजही चांगले संबंध आहे, अशा मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.
थोडक्यात बातम्या-
परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…
राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण
एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन
“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”
‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा
Comments are closed.