मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. यावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पााहयला मिळत आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडीच्या (ED) कारवायांसाठी आणखी एकदा भाजपला जबाबदार धरलं आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवायांवरून संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्रात पैसे जरा जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सावध राहा, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी अनेकदा केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून राऊतांनी आजही खोचक शब्दात टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
बुचामध्ये शेकडो मृतदेहांचा खच; ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य बघून झेलेन्स्की सुन्न
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उद्या म्हणाल मी घराबाहेर पडत नाही तोपर्यंत…”
रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर
दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का
लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
Comments are closed.