संजय राऊतांचा थेट फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…
नवी दिल्ली | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. याच प्रकरणावरून संजय राऊतांनी आता थेट भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी झाली. त्या युद्धनौकेचा तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माणसाने लिलाव मांडला. त्यातून काही कोटी रूपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि तुम्ही म्हणता पुरावे कुठंय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत काहीही बोलतात असं तुम्ही म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही. तुम्ही काय xपटलंं, तुम्ही काय कापलं सांगा?, असा थेट सवाल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.
दरम्यान, तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे आमचं नाही. तिथे तुमचे आदेश पाळले जातात, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश
“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”
संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”
“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “
Comments are closed.