Loading...

राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार?; तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक

मुंबई | राज्यात महाशिवआघाडीचं सरकार सत्तेत येण्याची शक्यता आता अधिकच दाट होत चालली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवण्यासाठी मुंबईत सध्या महत्वपूर्ण बैठक सुरू आहे.

तिन्ही पक्षांच्या या संयुक्त बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे नेते उपस्थित आहेत.

Loading...

तिन्ही पक्षांचे नेत्यांच्या या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवण्याची शक्यता आहे. यातस सत्तास्थापनेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असण्याची शक्यता आहे.

या आधीच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने जर तिन्ही पक्षांना एकत्र येत सत्तास्थापन करायचं असेल तर काही मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे.सरकारची पुढची ध्येय धोरणं काय असतील? कोणते मुद्द्यांवर सरकारने काम केलं पाहिजे?, यावर चर्चे होणं आवश्यक असल्याचं बोलून दाखवलंहोतं. आता या संयुक्त बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 


 

Loading...

 

 

Loading...