Top News विधानसभा निवडणूक 2019

शिवसेना-राष्ट्रवादी सत्तास्थापन करणार? ‘महाशिवआघाडी’ होणार?

मुंबई | भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन करेल तर काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. गेले काही दिवस भाजपची भूमिका स्पष्ट होत नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्पष्ट भूमिका घेत नव्हते. शिवसेनेसोबत जाणार की नाही हे स्पष्टपणे सांगत नव्हते मात्र आता शिवसेना राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मनवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याने त्यांना सत्तेत पाठिंबा मिळणार नाही. पण काँग्रेसचा नेता विधानसभा अध्यक्ष व्हावा, अशी इच्छा काँग्रेसची आहे. त्यामुळे जर शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या