Top News पुणे महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज- पुण्यासह इतर महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार

Photo Courtesy- Facebook/Sharad Pawar

पुणे | पुणे महापालिकेसह इतर महापालिकेच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या निवडणुका लढवताना काँग्रेसलाही यात घेण्याचा विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसेना-राष्ट्रवादी आगामी काळातही एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या शहरात त्या पक्षाच्या वाट्याला जास्त जागा येतील, मात्र एकत्र लढणे हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं जाण्याचा मार्ग असेल, असं ते यावेळी म्हणाले. पुण्यात बैठका सुरु असून एकत्र निवडणुकांचं सूत्र ठरलेलं आहे, काँग्रेसलाही सोबत घेण्यासंदर्भात चर्चा केली जाईल, असं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी इतरही काही मुद्द्यांवर भाष्य केलं.

भाजप प्रवेशासाठी त्यांनी मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या प्रयत्नांमुळे राम मंदीर आंदोलनाला धार आल्याचा दावा त्यांनी केला. अब्दुल कलाम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राष्ट्रपती केल्याचं वक्तव्य केल्याने चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचं हसं करुन घेतलं, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीनं अद्याप अधिकृतपणे एकत्र लढण्याची घोषणा केलेली नाही, मात्र संजय राऊत यांची भूमिकाच शिवसेना-राष्ट्रवादीची असू शकते. काँग्रेसही यामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

मी कंबर हालवत बसत नाही तर सरळ हाडं तोडते- कंगणा राणावत

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…

पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?

‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या