शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची सरशी, भाजपला मोठा धक्का

मुंबई | अंबरनाथ पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. 8 पैकी 6 जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत.

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंबरनाथच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीच्या निमित्ताने नवीन समीकरण उदयास आलं आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असणाऱ्या पाच पंचायत समित्यांसाठी काल (बुधवार) मतदान पार पडलं. या मतमोजणीचे निकाल सध्या येत आहेत.