महाराष्ट्र मुंबई

“मनोहर जोशींनी केलेलं ‘ते’ वक्तव्य वैयक्तिक, शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही”

मुंबई | शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत मनोहर जोशींनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक असून शिवसेनेची ती अधिकृत भुमिका नाही. त्यांच्या पिढीच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या भावना असणं हे स्वाभाविक आहे. मात्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

मला स्वतःला असं वाटतं की, छोट्या मोठ्या गोष्टींवरुन आपसांत झगडा करण्यापेक्षा काही सहन करावं. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. पण एकत्र काम केलं तर तिघांच्याही फायद्याचं ठरंल, अशी मला खात्री वाटते, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि भाजपची गेली 28 वर्ष युती होती. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपचं बिनसलं. मात्र मनोहर जोशींनी सेना-भाजप पुन्हा एकत्र येतील, असं वक्तव्य केलं होतं.

मनोहर जोशींचं हे वक्तव्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात धडकी भरवणारं होतं. तर भाजपला दिलासा देणारं होतं. मात्र नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या