…तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली- संजय राऊत

मुंबई | अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यावर चर्चा करण्यापेक्षा या हल्ल्याचा बदला घ्या,अन्यथा या देशातील ८० कोटी हिंदूंचा वाली कोण?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारलाय. 

१९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असं ठणकावलं होतं, त्यामुळे ती यात्रा निर्विघ्न पार पडली, असंही राऊत यावेळी म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या