Top News देश

…मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई | सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? असा सवाल शिवसेनेने केंद्र सरकारला केला आहे.

कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तिथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणं हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही, अशा शब्दांत सामन्याच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला टीका करण्यात आलीये.

मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जिथे पाकड्यांची मिजास चालते तिथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तिथेच आहे, असंही शिवसेनेने म्हटलंय.

“कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीक्र आहेत. काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवं,” असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

पॉवर-प्लेमध्ये हैदराबादच्या वॉर्नर आणि साहाने दिल्लीकरांना दणका देत केला मोठा पराक्रम

कमल नाथ, दिग्विजय सिंह हे प्रदेशमधील मोठे सर्वात मोठे गद्दार- ज्योतिरादित्य शिंदे

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या