बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

मुंबई | फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरलं, मग आताच कसं पडेल? असा सवाल शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधाने पडणार, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला शिवेसेनकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.

महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ अंतर्विरोधाने पडेल, असे विरोधकांना का वाटते? तसे घडणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन शिवसेना-भाजपात घडले, पण तेव्हा सरकार टिकले. मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले. मग आताच कसे पडेल?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्गत झगड्यांतून पडेल, असे एक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे तीन पक्षांत आपसात काही फाटेल आणि सरकार कमजोर होऊन पडेल याकडेच विरोधी पक्षाच्या आशा लागल्या आहेत, असा टोला भाजपला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक!

लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड!

कोरोना भारतात कुणी आणला?, संजय राऊतांनी सांगितलं ‘त्या’ व्यक्तीचं नाव

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More