मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केलं. या भाषणानंतर मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हणण्यात आलंय.
अग्रलेखात नमूद केल्यानुसार, देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!
पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत. हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झालं. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासलं नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केलं, असं ही शिवसेनेने म्हटलं आहे.
मोदी यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचं सांगितलं. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचं कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होतं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्थायी समितीची सभा घेण्यास हायकोर्टाची परवानगी!
भाजपला मोठा धक्का; एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, आता परवानगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात येता येणार नाही
ओ जाने वाले, हो सके तो लौट के आना…- सुधीर मुनगंटीवार
सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करेल- उद्धव ठाकरे