प्रशांत परिचारकांचं निलंबन कायम ठेवा, शिवसेना आक्रमक

मुंबई | आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेतल्यामुळे शिवसेना आक्रमक झालीय. निलंबन कायम ठेवा या मागणीसाठी शिवसेनेकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलंय. 

पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, असं वादग्रस्त वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केलं होतं. 

दरम्यान, यासंदर्भात नेमलेल्या समितीनं परिचारकांचं निलंबन मागे घेण्याची शिफारस केली होती. त्यानूसार हे निलंबन मागे घेण्यात आलंय.