शिवसेनेचा यू-टर्न, रामनाथ कोविंद यांनाच राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई | राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर घेण्यात आलेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दलितांच्या मतांचं राजकारण करण्यासाठी भाजपनं दलित उमेदवार दिल्याची टीका कालच उद्धव ठाकरे यांनी केली होती. 

दरम्यान, स्वामिनाथन यांची प्रकृती बरी नसते. तसंच कोविंद यांची माहिती घेतली असून ते चांगल्या कुटुंबातून आलेलं साधं सरळ व्यक्तीमत्व असल्यानं त्यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या