बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात
मुंबई | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का देत बंड करुन सुरतमार्गे गुजरातला पोबारा केला. त्यानंतर भाजपने या सत्तासंघर्षात उडी घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे हे पाहुन बहुमत चाचणी घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविला. त्यानुसार राज्यपालांनी तात्काळ उद्या (दि. 30) रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे.
शिवसेनेने या अधिवेशनाला विरोध करत हे अधिवेशन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अधिवेशनावरुन त्यांनी भाजपवर टिका केली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांकडे आम्ही 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र तो मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. आता बहुमत चाचणीबाबत ते चांगलीच तत्परता दाखवत आहेत. राफेलपेक्षा राज्यपालांचा वेग जास्त आहे, असा हल्ला राऊत यांनी केला.
बहुमत चाचणीच्या निर्णायाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. 16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. ते कायद्यात बसत नाही. शिवसेनेचे आमदार फोडून भाजप राज्यातील सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. असे राऊत म्हणाले.
या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी तीन वाजता याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. केंद्रालाही याप्रकरणी बाजू मांडायची आहे. या याचिकेला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या याचिकेवर न्यायालय काय निकाल देते हे पहाणे महत्वाचे ठरेल.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! राज्यपालांनी दिलेले ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट
“राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येणार”; मोठी स्ट्रॅटेजी आली समोर
राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
Comments are closed.