‘पद्मावती’वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर

औरंगाबाद | पद्मावती सिनेमाच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता शिवसेना पद्मावती सिनेमाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. 

औरंगाबादच्या महाराणा प्रताप उद्यानाबाहेर शिवसेनेनं ‘पद्मावती’ सिनेमाच्या विरोधात निदर्शनं केली. शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं पार पडली. 

शिवसेना हिंदूंच्या रक्षणासाठी काम करते, त्यामुळे हिंदू राणीचा अपमान सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रात या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली.