महाराष्ट्र मुंबई

शिवसेना किरीट सोमय्यांनंतर पूनम महाजनांनाही ‘आस्मान’ दाखवायच्या तयारीत!

मुंबई |  शिवसेनेने किरीट सोमय्यांनंतर आता ईशान्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर प्रहार करण्याचं ठरवलेलं दिसतंय.पूनम महाजन यांच्या मतदारसंघात युवासेनेनं निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. 

युतीकडून जर किरीट सोमय्या उमेदवार असतील तर काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका, असे विरोधाचे सूर शिवसैनिकांनी दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानी घातलेले आहेत.

दुसरीकडे पूनम महाजन यांच्या बालेकिल्ल्यात युवासेनेने आरोळी मारण्याचं ठरवल्याने त्यांच्या चिंंतेत नक्कीच भर पडली असेल. त्यांच्याही नावाला शिवसैनिकांचा जोरदार विरोध आहे.

दरम्यान, शिवसेना भाजपच्या मतदारसंघात मेळावे आयोजित करून भाजपला शह देण्याची रणनीती आजमावून पाहतेय की काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सगळं लखनऊ झालंय प्रियांकामय! उ. प्रदेशची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियांका पहिल्यांदाच लखनऊमध्ये

टी-20च्या रंगतदार सामन्यात भारताचा निसटता पराभव

-मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर

-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या