Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”

मुंबई |  जनतेने म्हणजेच त्यामध्ये शेतकरी आलेच यांनी तुम्हाला  दुसऱ्यांदा एका विश्वासाने सत्ता दिली आहे. बळीराजाच्या या विश्वासाला तडे देण्याचे काम कृषी सुधारणा कायद्यांनी केलं असल्याची टीका सामनाच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा हा तडा आणखी वाढणार नाही, शेतकरी आंदोलनाचा वणवा देश भरात पसरणार नाही, बळीराजाला हवे असलेले न्याय मागण्यांचे दान त्याच्या पदरात पडेल हे पाहण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.7

केंद्रातील सरकारचे नवीन कृषी सुधारणा कायदे त्याचा ‘बळी’ घेण्यासाठीच करण्यात आले आहेत असे एकंदर वातावरण आहे. या कृषी सुधारणा सामान्य शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत. त्याला शेतमाल विक्रीचे ‘स्वातंत्र्य’ वगैरे देणाऱ्या आहेत असे अनेक दावे केंद्र सरकारतर्फे केले जात असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, आंदोलन लांबवायचे आणि शेतकऱयांचा निर्धार डळमळीत होण्याची वाट पाहायची तशी संधी मिळताच आंदोलन निप्रभ करायचे, आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे दिसले असं म्हणत अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!

दिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा- सायरा बानो

कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…

भारत बंद’ला अनेक राजकारण्यांचा पाठिंबा मात्र आंदोलनस्थळी राजकारण्यांसदर्भात मोठा निर्णय!

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या