महाराष्ट्र मुंबई

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!

मुंबई | मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रेलखातून विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.

मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाजप पुढार्‍यांची विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती गमतीची आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचं शिवप्रेमींना आवाहन, म्हणाले…

क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क

राज्याच्या या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या