बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा”; ‘सामना’तून भाजपवर बाण

मुंबई | सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये, असं म्हणत शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे, असं म्हणत भाजप आणि संघावर सामनातून टीका करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. तसेच भाजपचा सावरकरांबाबतचा पुळका खोटा आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते; आता झाला देशातील सर्वात तरूण IPS अधिकारी

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

महत्वाच्या बातम्या-

‘भाजप नेत्यांवर अजून FIR का दाखल झाला नाही?’ असं सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली!

…नाहीतर पेकाटात नक्कीच लाथ बसेल; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More