महाराष्ट्र मुंबई

कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा

उद्धव ठाकरे

मुंबई | नाणारचा प्रकल्प जहर आहे. तो लादला तर आणीबाणी लादण्यासारखे आहे. लादून बघाच, हे आमचं आव्हान आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. 

कोकणला तुमच्या रोजगाराची गरज नाही. त्यांची शेती, फळबागा हाच त्यांचा रोजगार आहे. कोकणच्या जनतेचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती भाजप सरकार करणार आहे?, असा प्रश्नही या अग्रलेखात उपस्थित केला आहे. 

दरम्यान, कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. प्रयत्न केलाच तर कोकणातच नाहीतर देशात माती खायला लावू, हा आमचा शब्द आहे, असा इशाराही दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल

-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या