मुंबई | कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे मात्र सरकारनेही अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदी दिल्लीतील गुरुद्वारा रकीबगंज येथे गेले होते. शेतकरी आंदोलनाकडे न जाता मोदी तिकडे गेल्यावरून त्यांच्यावर सामनाच्या अग्रलेखावरून निशाणा साधण्यात आाला आहे.
शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज येथे पोहोचले, तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. पंतप्रधान मोदी यांनी गुरू तेगबहादूर यांच्याकडून प्रेरणा घेतली. आनंद आहे. दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीख लढवय्येसुद्धा त्याच प्रेरणेतून लढत आहेत. त्यामुळे लढाईचा अंत काय, हा प्रश्नच आहे, असं ‘सामना’नं अग्रलेखात म्हटलं आहे.
तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली. परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नसल्याचं अग्रलेखात सांगितलं.
दरम्यान, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची ‘वेळ’ येईल, तुमच्या कर्मांचा ‘हिशोब’ होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेले नाही आणि करू शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा!, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल
…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौ
कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी