महाराष्ट्र मुंबई

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

मुंबई | राम मंदिराच्या प्रश्नावरून शिवसेनेनं मुखपत्र सामनातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी, असं मत शिवसेनेनं अग्रलेखात मांडलं आहे.  

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात मोदींनी भगवी पगडी घालून भाषण केले. त्या पगडीमागे काय दडलंय?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. रामप्रभू वनवासातच आहेत आणि आम्ही फक्त भगव्या पगड्या घालत आहोत. खरे म्हणजे ‘राम मंदिर होईपर्यंत डोक्यावर भगवी पगडी घालणार नाही’ असे मोदींनी सांगायला हवे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, राम मंदिराचा प्रश्न आणखी किती काळ लटकवत ठेवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे बोटे दाखवून तीच बोटे किती काळ चाटत बसणार आहे, असा प्रश्न सध्या रामभक्तांच्या मनात आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या