Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती केलीये”

मुंबई | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो अशी टीका केली होती. याला उत्तर देताना “त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आपली नियुक्ती केली असल्याचं,” संजय राऊत यांनी सांगितलंय.

“मग ही चांगली गोष्ट आहे. कानाला, डोळ्याला, पोटाला तसंच ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही संजय राऊत यांना केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी सुरु ठेवलंय. यावरून शेतकरी का दहशतवादी आहेत का? असा सवाल त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

अर्जेंटीना फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची होणार चौकशी

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद

तिसऱ्या वनडे पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; 2 प्रमुख खेळाडू संघाबाहेर

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

“तुमची पिढी संपेल मात्र हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या