Top News राजकारण

“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नितीश राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार दगाफटका करण्यात माहिर असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

संजय राऊत म्हणाले, “जेव्हा नितीश कुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. या कारणाने बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो.”

शिवाय नितीश कुमारा दगाफटका करण्यात माहिर असून त्यांनी माजी मंत्री जॉर्ज फर्नांडेस यांना दगा दिलेला. त्याचसोबत सत्तेत असताना देखील लालू प्रसाद यादव यांना दगा दिला होता. एनडीएसोबत देखील त्यांनी दगा केला आहे. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची शाश्वती सध्या तरी देता येणार नाही, असं राऊत यांनी सांगितलंय.

दरम्यान महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा 

    “नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत” 

पुणे पदवीधरमध्ये “संग्राम”ने वाढवल्या भाजपसमोरच्या अडचणी!

“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?” 

“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या