महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेसारखी लोक राजकारण्यांची गरज असते, राऊतांचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई | उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देशाच्या कोणत्याही राज्यात असं झालं तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक व्हिडीओ!; विकास दुबेचा एन्काऊंटर होण्याआधी मीडियाच्या गाड्या अडवल्या

विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“बाळासाहेबांनी एक शरद बाकी गारद शीर्षकाने अग्रलेख लिहिला होता, तुमचा अभ्यास पक्का करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या