मुंबई | शिवसेनेने सामनामधील अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका केलीये. यानंतर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीये.
यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. यावेळी संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार म्हणतात, “ज्या प्रकारची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून येतेय त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावीशी वाटतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा शिवसेनेनं केव्हाच ऱ्हास केलाय. आणि आज ते सत्तेत बसलेत हे दुर्देव महाराष्ट्र पाहतोय.”
ते पुढे म्हणाले, “संजय राऊत यांना नोटीस मिळाल्यापासून ते ज्या पद्धतीने लिखाण करतायत यावरून त्यांना मनापासून एक सल्ला द्यावासा वाटतोय. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.”
थोडक्यात बातम्या-
आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय
“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”
कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..
‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!
वयाच्या अवघ्या 17 वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने केला भाजपमध्ये प्रवेश