बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”

मुंबई |  पाकिस्तानशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही. पाकिस्तान हा चीनचा गुलाम आहे. मात्र चीनशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी व ती पंतप्रधान मोदी यांच्यापाशी आहे. त्यामुळे चीनला घाबरण्याचे कारण नाही. देशाने चिंता करू नये. सीमेवरील सैन्य खंबीर आहे. 1962 सालचा हिंदुस्थान आज नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत, असा टोला लगावत हे चीनला भारत काय आहे ते दाखवून द्यायची हीच वेळ आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून भारत-चीन संबंधावर प्रकाशझोत टाकत चीनवर सडकून टीका करत चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं मत मांडलं आहे.

चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले व दोन देशांत संबंध सुधारतील असे सांगूनही गेले, पण त्यानंतर चिनी सैन्याने आमच्या हद्दीत अनेकदा घुसखोरी केली. आधी डोकलाम व आता लडाखमध्ये युद्धाची स्थिती निर्माण केली. ही फसवणूकच आहे, असंही राऊत यांनी आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.

एका बाजूला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे ढोल पिटायचे व दुसर्‍या बाजूला चीनची बाजारपेठ खुली ठेवायची. यातून चीनला आर्थिक बळ मिळते. कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि हिंदुस्थान-चिनी मालाची बाजारपेठ खुली करून चीनच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं अग्रलेखाच्या सरतेशेवटी राऊत म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातील ‘हे’ शहर बनतंय नवं वुहान; मृत्यूदराची आकडेवारी धडकी भरवणारी

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच, आता चीनलाही टाकलं मागं

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता ‘हा’ पर्याय, सरकारची महत्त्वाची माहिती

“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More