Top News राजकारण

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेतून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. तर यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, उर्मिला मातोंडकरांचा विषय हा सीएमच्या अखत्यारित आहे आणि कॅबिनेटचा निर्णय आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्य म्हणजे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या