महाराष्ट्र मुंबई

भाजपसोबत असलेली 30 वर्षांची मैत्री शिवसेनेने तोडू नये- रामदास आठवले

मुंबई | शिवसेनेची वाटचाल पाहता शिवसेनेने भाजपशी असलेली 30 वर्षांची मैत्री तोडू नये, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेने मतदानात सहभाग घेऊन मोदी सरकारला साथ देण्याची गरज होती. तेव्हा शिवसेनेनं बहिष्कार टाकून अविश्वसाचं पाऊल उचलले आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.  

दरम्यान, 2019ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचा प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संताप

-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे

-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या