महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्र्यांनी एकच मारला, पण सॉलीड मारला’; शिवसेनेचा राज्यपालांना खोचक टोला

मुंबई | राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला, असा खोचक टोला शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर टीका केलीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?, अशं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

जलयुक्त योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले?; रोहित पवारांची टीका

‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

“दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचं नाव घेणं हाच मुळात विरोधाभास”

पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, वीजही गायब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या