बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”

मुंबई | जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्यानं जोरदार राजकारण सुरू झालंय. यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आता शिवसेनेनं देखील यावरून भाजपला धारेवर धरलं आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर केली आहे.

मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असं मोदी भक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल, असा टोला शिवसेनेनं नरेंद्र मोदींना लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकलं असं वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणं हा गुन्हा नाही, पण आपण देशाचं नेतृत्व करत आहोत हे भान विसरून कसं चालेल, असं म्हणत शिवसेनेनं मोदींना खडेबोल सुनावले आहेत .

थोडक्यात बातम्या-

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण!

घर बांधणं आता आणखी सोप्पं होणार; हसन मुश्रीफ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! नव्या कोरोनापासून शरिराच्या ‘या’ अवयवाला आहे सर्वाधिक धोका

1 मार्चपासून शाळा बंद की चालू??? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More