बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी हे फकीर आहेत, ते कधीही झोला उचलून हिमालयात जातील”

मुंबई | जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आता शिवसेनेनं देखील यावरून भाजपला धारेवर धरलं आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असं मोदी भक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल, असा टोला शिवसेनेनं नरेंद्र मोदींना लगावला आहे.

जे घडलं त्यात मोदींचा काही दोष नसावा. मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. त्यांचे भक्तच त्यांच्या नावाने हे भलतेसलते उद्योग करत आहेत. मोदी हे एकदम योग्यासारखे तटस्थ आणि नम्र असल्याने ते या उद्योगांकडे थंडपणे पाहतात इतकंच, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकलं असं वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणं हा गुन्हा नाही, पण आपण देशाचं नेतृत्व करत आहोत हे भान विसरून कसं चालेल, असं म्हणत शिवसेनेनं मोदींना खडेबोल सुनावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर तुम्ही कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या’, हसन मुश्रीफांचं भाजप नेत्यांना आव्हान

लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ

‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया

‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More