बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”

मुंबई | खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?, असा सवाल करत शिवसेनेनं नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी राष्ट्राचा विचार करत असतील तर ते राष्ट्रीय संपत्तीचा बोजवारा उडवणार नाहीत. ही सर्व संपत्ती गेल्या सत्तरेक वर्षांत मोठ्या कष्टातून उभी राहिली आणि त्यात भाजप किंवा मोदी सरकारचे योगदान नाही. ज्यांनी हे सर्व तुमच्यासाठी कमवून ठेवलं त्यांना रोज लाथा घालायच्या हेच सध्या सुरु आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव पुढच्या काळात साजरा होईल त्या वेळी 75 वर्षांच्या काळात निर्माण केलेल्या राष्ट्रीय संपत्तीचा लिलाव झालेला असेल. मग नवे काय उभे राहिले, तर एक हजार कोटी रुपये खर्च करून निर्माण होणारे नवे संसद भवन! संसद भवनाची मालकी तरी भविष्यात स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकांकडे राहू द्या इतकंच, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून मोदींना लगावला आहे.

देशातील प्रमुख बंदरे, विमानतळे इतकेच काय, काही राष्ट्रीयीकृत बँकांचेही खासगीकरण सुरू झाले आहे. सार्वजनिक उपक्रम भांडवलशहांच्या हाती द्यायचे हेच मोदी सरकारचे धोरण दिसते. एअर इंडिया, माझगाव डॉक, बंदरे, राष्ट्रीयीकृत बँका हे सार्वजनिक उपक्रम आपली राष्ट्रीय संपत्तीच होती. भांडवलदारांच्या घामातून ही संपत्ती निर्माण झाली नव्हती, पण मोदी सरकारने ही राष्ट्रीय संपत्ती फुंकून किंवा विकून टाकली आहे, अशी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून गेली आहे.

थोडक्यात बातम्या- 

खळबळजनक! पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप

शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More