बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”

मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्यावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी बांगलादेशात जाऊन आले. पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, असा सल्ला शिवसेनेनं मोदींना अग्रलेखातून दिला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ आणि पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, असा टोला शिवसेनेनं नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पश्चिम बंगालात निवडणुकांचे रण पेटले असतानाच पंतप्रधान मोदी हे बाजूच्याच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. मागे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढला असताना मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले. तेथे पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दिवसभर पूजाअर्चा करीत होते. गाईला चारापाणी घालत होते. हे सर्व देशभरातील वृत्तवाहिन्या सतत दाखवत होत्या. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र प. बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावं, अशी बोचरी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून मोदींवर केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस

नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदयानं काढली जंगी मिरवणूक; पाहा व्हिडीओ

विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा व्हिडीओ

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!

‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More